प्रधानमंत्री मोदींनी पराभवाच्या भीतीने तीन कृषी कायदे रद्द केले

शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर येणाऱ्या निवडणुकामध्ये भाजपाचा पराभव होईल या भीतीने प्रधानमंत्री मोदींनी तीन काळे कायदे रद्द करण्याची घोषणा केली
काल अचानक प्रधानमंत्री मोदींनी देशातील जनतेची माफी मागत तीन काळे कृषी कायदे वापस घेत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना प्रधानमंत्री मोदी म्हणतात हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी होते परंतु काही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर आणलेले तीन कृषी कायदे जर शेतकऱ्यांच्या हिताचे असते शेतकऱ्यांना शेती मालासंबंधी व शेत जमिनी बाबतीत संरक्षण देणारे असते तर शेतकऱ्यांनी या कायद्याचा विरोध केला नसता आणि एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं नसतं.

प्रधानमंत्री मोदींनी काल तीन कृषी कायदे वापस घेत असल्याची घोषणा केली.देशातील शेतकरी एकजुटीचा आणि संघर्षाचा मोठा विजय झाला आहे.मागील एक वर्षांपासून या तीन काळ्या कायद्याविरोधात शेत करी आंदोलन करत आहेत. ऊन वारा पाऊस थंडी अशा कठीण परिस्थितीत रस्त्यावर बसले होते. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले अन्न पाणी, वीज पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला पोलिसी बळाचा वापर केला परंतु शेतकरी संघटना एकजुटीने लढत राहिल्या तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनानी घेतली.

डिझेल पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती मुळे देशातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली. त्याचा परिणाम म्हणून 5 राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मोदी सरकारने डिझेल आणि पेट्रोल दरात अनुक्रमे 10 आणि 5 रुपये प्रति लिटर कमी केले.

आज अचानक देशाच्या जनतेची जाहीर पणे माफी मागत तिन्ही केंद्रीय कृषी कायदे वापस घेत असल्याची घोषणा प्रधानमंत्री मोदींनी केली. याचेही एक कारण आहे. मागील एक वर्षांपासून शेतकरी हे काळे कायदे वापस घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. आंदोलना दरम्यान साडेपाचशेच्यावर शेतकरी मृत्यू मुखी पडले तेव्हा मोदी सरकारला त्यांची दया आली नाही उलट हे शेतकरी देशद्रोही आतंकवादी खलिस्थानवादी असल्याचा सिक्का मारला.

 केंद्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून 4 शेतकऱ्यांना मारले. अशी शेतकरी विरोधी कठोर भूमिका घेणारे केंद्रातील भाजपा सरकार नमले तरी कसे? याचे एकमेव कारण म्हणजे येणाऱ्या काही महिन्यात पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या आंदोलनात पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी मोठ्या ताकतीने लढा देत आहेत. तीन कृषी कायद्याच्या बाबतीत विरोधक रान पेटवतील आणि त्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसेल या भीतीने प्रधानमंत्री मोदींनी तिन्ही नवे कृषी कायदे वपास घेत असल्याची घोषणा केली.

 भाजपा आणि भाजपा भक्त असा विचार करत असतील की मोदींनी मास्टरस्ट्रोक मारून विरोधकांची हवा कडून घेतली. परंतु हा मास्टर स्ट्रोक वगैरे काही नसून भाजपाला पराभवापासून वाचवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. यात शेतकरी संघटनानी दाखवलेल्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय झाला आहे.
Previous
Next Post »