नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा घेतली शपथ
मागील महिन्यात महाराष्ट्रात जशा राजकीय घडामोडी घडल्या आणि बीजेपी - शिंदे घाटाने सरकार स्थापन केलं.त्यानंतर आता बिहारच्या राजकारणात सुद्धा राजकीय भूकंप झाला आणि जेडीयू (JDU) चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपा सोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या सोबत पुन्हा गाठबंधन करून सरकार स्थापन केलं आहे.नव्या सरकारच्या रूपाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर या सरकार मध्ये तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.भाजपा जेडीयू मध्ये फूट पाडत असल्याच्या कारणावरून भाजप सोबतची युती तोडली असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.या पूर्वी देखील नितीश कुमार यांनी अशाच प्रकारे राजद सोबतची युती संपुष्टात आणुन सरकार बरखास्त करून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
भाजपा सोबत आघाडी करून नितीश कुमार यांनी निवडणूक लढविली होती. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षा कमी जागा मिळून सुद्धा बीजेपीने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनविले होते. परंतु आता बीजेपी जेडीयू मध्ये फूट पाडत असल्याचे कारण सांगत नितीश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेतली. परंतु बीजेपी ने नितीश कुमार यांचे आरोप फेटाळून लावले असून ते संधी साधू असल्याचे म्हटले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon