मुंबईतील कुर्ला परिसरात 4 मजली इमारत कोसळली ; ढिगाऱ्याखाली अनेकजन अडकल्याची भीती

कुर्ला पूर्व भागात नाईक नगरात कोसळलेली इमारत 
मुंबई : सोमवारी मध्यरात्री उशीरा मुंबईतील कुर्ला पूर्व भागात असलेल्या नाईक नगर मध्ये 4 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव व मदत कार्य सुरु केले.अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 जनांना बाहेर काढून वाचवले आहे. तर अनेकजन ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने इमारतीत अडकलेलेंना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य चालु आहे.या परिसरातील काही इमारती खाली करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने रहिवाशांना दिल्या होत्या. परंतु त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी त्या खाली केल्या नव्हत्या. कोसळलेली इमारत ही त्यापैकीच एक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous
Next Post »