राज्यातील एसटी कर्मचाऱ्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणित संघटनाचे लोक मोठ्याप्रमाणात असून देखील कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आली
राज्यात मागील अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी संपावर आहे. मागील 17 दिवसापासून एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. राज्यातील सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनिकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असून संप मिटण्याचा अजून कोणताचा पर्याय निघाला नाही.
परंतु महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मोठ्याप्रमाणात समर्थक असताना आणि या तिन्ही पक्षांच्या संघटना कार्यरत असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संप ज्या पद्धतीने सुरु आहे त्याबद्दल आश्चर्य वाटते शिवाय नुकत्याच पारपडलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात वर्तमान गृह राज्यमंत्री पराभूत होतात.
शरद पवारांचे खंदे समर्थक शशिकांत शिंदे पराभूत होतात यामधून कोण कुणाचे समर्थक आणि कोण कुणाचे विरोधक हे सर्व सामान्य जनतेला कधीच समजणार नाही.या बद्दल त्यांचे राजकीय नेते आणि त्यांचे सर्वोच्च नेते यांच्या भूमिकाबद्दल देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.आश्चर्यच आहेना!! अशा प्रकारकाचा खोचक टोला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांनी सरकार मधील तिन्ही पक्षांना व कामगार संघटनांना लगावला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon