राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विरोधात बीआरएसपीची तक्रार दाखल
औरंगाबाद : 9 ऑगस्ट 2022 रोजी आझादी का अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अशोक चक्र नसलेला राष्ट्रध्वज लावून अवमान (The Collector insulted the national flag) केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे .याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवार 9 ऑगस्ट 2022 रोजी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आयोजित केलेल्या सामूहिक राष्ट्रगीत गायन, स्वराज्य महोत्सव अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव क्रांती दिनाच्या निमित्त विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर औरंगाबाद येथे 17000 विद्यार्थी व त्यांच्या सोबत शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन कार्यक्रम पारपडला.या कार्यक्रमात देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा मोठ्या आकारात लावण्यात आला होता मात्र त्या झेंड्यात अशोक चक्र वापरले नव्हते.
राष्ट्रध्वजात जाणीवपूर्वक अशोक चक्र लावण्यात आले नसून हा मुद्दाम पणे केलेला खोडसाळ पणा आहे. म्हणून कायदा 1971 कलम 2 अनुसार भारतीय राष्ट्रधवाजाचा अवमनापासून संरक्षण अनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान हा गुन्हा आहे. असं असताना अशोक चक्राशिवाय राष्ट्रध्वज अपूर्ण असल्याची माहिती असून सुद्धा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अपूर्ण असलेला राष्ट्रध्वज लावून राष्ट्रधवाजाचा अवमान केला आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरिधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार अरविंद कांबळे जिल्हाध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट औरंगाबाद यांनी दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon