Pankaja Mundhe:पंकजा मुंढे यांचा विधान परिषद उमेदवारीतून पत्ता कट
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. बीजेपीने 5 जागा लढविण्याचे ठरवले असल्यामुळे आता 5 उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय व उमा खापरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या पंकजा मुंढे यांचा मात्र पक्षाने पत्ता कट करून त्यांच्या जागी उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.राज्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंढे यांना राज्यसभेची किंवा विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती.त्यांचे नाव देखील चर्चेत होते. परंतु भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारून पंकजा मुंढे यांना चांगलाच धक्का दिला आहे.विधान परिषदेची उमेदवारी पक्षाने दिली नसल्याने नाराज पंकजा मुंढे काय भूमिका घेणार. भाजपाला सोडचिट्टी देणार का? की पक्षातच राहणार हे येत्या काळात कळेलच. मात्र भाजपाने पंकजा मुंढे यांचे राज्यातील राजकारणामधील वर्चस्व कमी करण्यासाठी हा खेळ खेळला आहे.त्यामुळेच उमा खापरेंना उमेदवारी देऊन पंकजा मुंढे यांना विधान परिषदेवर जाण्यापासून रोखण्यात येत आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उमा खापरे म्हणतात पंकजा मुंढे ह्या मोठ्या नेत्या आहेत. पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. कदाचित पंकजा मुंढे यांनी माझ्या नावाची शिफारस केली असेल असं देखील उमा खापरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
पंकजा मुंढे यांचे भवितव्य काय
बीजेपीने पंकजा मुंढे यांना सर्व बाजूने चेकमेट केलं असल्याचे दिसून येत आहे. भाजपा पंकजा मुंढेच राज्यातील वर्चस्व संपवू पहाते काय? किंवा केंद्रीय पातळीवर आणखी मोठी जबाबदारी पंकजा मुंढे यांना दिली जाणार का?. मात्र आजच्या घडीला पंकजा मुंढे यांना भाजपाने राज्यसभा आणि विधान परिषदेची उमेदवारी नाकारत राजकीय पंख छाटून पंगू केलं आहे हे मात्र खरं आहे.पंकजा मुंढे पक्षाला सोडचिट्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करून राजकीय भरारी घेणार का? हे मात्र येत्या काळात दिसून येईल.
ConversionConversion EmoticonEmoticon