चालकाने मद्यधुंद अवस्थेत रातराणी बस चालवल्यामुळे अपघात घडल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे
पालघर : (palghar bus accident )एस टी महामंडळाची भुसावळ - भोईसर या मार्गावर चालणारी रातराणी बस पालघर मधील वाघोबा खिंडीत उलटल्याची घटना घडली आहे.या अपघातात बस मधील 15 प्रवाशी जखमी झाले असून त्यांना पालघरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.राज्य परिवहन मंडळाची रातराणी सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला होता. मात्र या चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.भरधाव बस चालवत असताना पालघर कडे जाताना वाघोबा घाटात ही बस कोसळली. सकाळी 6 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याला गाडी चालवायला देऊ नका असं वाहकाला प्रवासी सांगत होते. मात्र वाहकाने सुद्धा प्रवाशांचे ऐकले नाही.
चालक मद्यधुंद असल्यामुळे फार वेगाने आणि विचित्र गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचं म्हणणे आहे.या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांना पालघर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon