समृद्धी महामार्ग अंतर्गत जालना ते नांदेड द्रूतगती महामार्गच्या कामाला आला वेग,राजपत्रात अधिसूचना झाली प्रकाशित
परभणी : समृद्धी महामार्गला जोडण्यात येणाऱ्या जालना ते नांदेड द्रूतगती महामार्गाच्या भूसंपादनाला सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून भूसंपदान अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.राज्य सरकारचा महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली असून या प्रकलपांतर्गत महामार्गला जोडण्यात येणार असलेला जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग आता लवकरच तयार होणार आहे.
त्यासाठी लागणारी जामीन संपादित केली जाणार असून त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.हा द्रूतगती महामार्ग परभणी जिल्हातील सेलू जिंतूर परभणी आणि पूर्णा या चार तालुक्यातून जात आहे.या चारही तालुक्यातील जामीन संपादित करण्यासाठी या चारही तालुक्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना भूसंपदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
याबाबतीत राज्यपालांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे यांनी याबाबतीत असलेले आदेश काढले आहेत.सोबतच याच आदेशानुसार द्रूतगती महामार्ग प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची भरपाई म्हणून देय असणारी रक्कम ठरविण्यासाठी विभागीय आयुक्त यांना लवाद म्हणून नियुक्त करण्यात आले असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon