एसटी कर्मचाऱ्यांचा संप ;ऐन दिवाळीत प्रवाशांचे बेहाल

              (एसटी सेवा ठप्प )  
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे
परभणी : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे परभणीत एसटीच्या 800 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बंद असल्याने खाजगी वाहतूक करणाऱ्यांचे धंदे जोरात सुरु आहेत.खाजगी वाहतूक करणारे प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेऊन लूट केली जात आहे.

मागील अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन संपावर आहेत मात्र रविवार पासून एसटी सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.त्यामुळे परभणी जिल्ह्यातील चार आगारातून जवळ पास एसटीच्या 800 फेऱ्या रद्द झाल्या आहेत.परभणी जिल्ह्यातील चारही आगारामधील एक हजार 28 कर्मचारी संपात सहभागी असल्याने जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास करणाऱ्यांचे मात्र बेहाल झाले.

सोमवारी परभणी बस स्थानाकात प्रवाशांना गर्दी पाहायला मिळाली. खाजगी वाहतूक करणारांची मात्र सोमवारी चांदी झाली. प्रवाशांना जास्तीचे तिकिट भाडे आकारून खाजगी वाहतूक मोठ्याप्रमाणात दिवसभर चालू होती. या सर्व प्रकारमुळे प्रवाशांना मात्र अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Previous
Next Post »