राज्यात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतलली जाणारी आरोग्य विभागाची परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गाची परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा या संस्थेला दिले होते. त्यामुळे या परीक्षा नियोजन बद्ध आणि काटेकोर पणे घेण्याची सर्वस्वी जबाबदारी न्यासा या संस्थेची होती.परंतु परीक्षार्थीच्या प्रवेश पत्रातील नावामध्ये असणाऱ्या चुका आणि परीक्षा केंद्रामधील चुकामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे.वर्ग क आणि ड साठी 8 लाख परीक्षार्थी परीक्षा देणार होते.
आज 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थी पाचशे ते सहाशे किलोमीटर लांबून परीक्षा केंद्रावर पोहचले आहेत. अचानक परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आल्यामुळे आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा परीक्षार्थिना मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने न्यासा संस्थेला दिलेलं कंत्राट रद्द करून अनुभवी संस्थेला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिला पाहिजे. आणि जे परीक्षार्थी बस किंवा रेल्वेने निघाले होते त्यांचा तिकीटचा खर्च सरकारने द्यावा. कारण ही सर्व जबाबदारी राज्य आरोग्य विभागाची आहे.
मागील अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून अशा प्रकारची मोठ्याप्रमाणात नौकर भर्ती निघालेली नव्हती. त्यात कोविड मुळे अनेक नौकर भरत्या रखडल्या होत्या.कोविडच्या दीड दोन वर्षाच्या खंडा नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात राज्य आरोग्य विभागाकडून वर्ग क आणि ड ची सहा हजाराहून अधिक जास्त जागांची भरती जाहीर केली होती.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नौकरीची संधी मिळणार अशी अशा होती. परंतु परीक्षाच अचानक रद्द झाल्याने तरुणांची निराशा झाली आहे.
पुढील दहा दिवसात पुन्हा परीक्षेची तारीख ठरवली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परंतु परीक्षार्थ्यांना मात्र मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.यापुढे सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भावनेशी खेळ खेळला जाऊ नये याची सरकारने दखल घेतली पाहिजे.नौकरीच्या माध्यमातून रोजगार मिळेल यासाठी परीक्षार्थी खुपमोठ्या अडचणी सहन करत परीक्षा देण्यासाठी आले होते. परंतु अचानक परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थिंचे बेहाल झाले अहेत.
The state health department exams scheduled for September 25 and 26 were abruptly canceled. Nyasa was awarded the contract to conduct Group C and D examinations of the Health Department. Therefore, it was the sole responsibility of Nyasa to plan and conduct the examination in a rigorous and rigorous manner.
Candidates have reached the examination center from a distance of 500 to 600 km for the examination to be held on September 25. Due to the sudden message of cancellation of the exam, the examinee has to bear the mental and financial stress due to the sloppy management of the health department. The state government should cancel the contract given to the trust and give the contract to the experienced institute to conduct the examination. And the government should pay for the tickets of the candidates who left by bus or train. Because all this responsibility lies with the state health department.
The state government has not recruited such a large number of employees in the last several years. It was the first time since the two-and-a-half-year hiatus that the state health department had announced more than 6,000 Class C and D vacancies on such a large scale. But the sudden cancellation of the exam has disappointed the youth.
Health Minister Rajesh Tope has informed that the date of re-examination will be decided in the next ten days. However, the examinees have to bear the mental and financial hardship. The government should take note that the game should no longer be played with the sentiments of the educated unemployed youth. But due to the sudden cancellation of the exam, the examinees have become disillusioned.
ConversionConversion EmoticonEmoticon