ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास व एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार ;ओबीसी नेते गप्प का?

 ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास व एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार ;ओबीसी नेते गप्प का?
देशातील ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास ओबीसी मधील जातींची आकडेवारी समोर येईल आणि ओबीसीची देशातील लोकसंख्या नेमकी किती आहे हे कळेल.त्यानुसार राजकीयक्षेत्रातील,नौकरीमधील आणि शिक्षण क्षेत्रातील ओबीसीचा वाटा नेमका किती आहे हे ठरेल.आणि असं झालं तर देशातील राजकारण हे ओबीसी भोवती फिरेल आणि आरएसएस व भाजपाचे राजकीय वर्चस्व संपुष्टात येईल याभीतीने ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास केंद्रातील भाजपा सरकार तयार नाही.

स्वार्थासाठी भाजपातील ओबीसी नेते गप्प?
ओबीसीची जनगणना केली जाणार नाही असा ठराव संसदेत मांडला.त्यावेळी भाजपातील एकाही खासदाराने किंवा मंत्र्याने विरोध केला नाही किंवा ठरावाला आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे केंद्रातील भाजपा सरकार मध्ये ओबीसीचे 27 कॅबिनेट मंत्री असताना सर्वांनी ठरावाच्या बाजूने सहमती दिली. सर्व ओबीसी नेते गप्प का होते. ओबीसीच्या हिताच्या विरोधात सरकार निर्णय घेत असताना ओबीसी नेत्यांनी विरोध का केला नाही. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि नौकरी मधील नुकसान होत आहे हे माहित असून देखील ही नेते डोळे बंद करून बसले होते.सत्तेत असताना समाज हिताच्या विरोधात निर्णय घेतला जात असताना त्याला विरोध करण्याची हिम्मत नाही आणि सत्ता गेल्यास पुन्हा आमच्यावर अन्याय होतोय अशी बोंब मारायची ही केवळ स्वार्थी नेत्याची लक्षणं अहेत.

महाराष्टातील ओबीसीचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजपातील ओबीसी नेते राज्यसरकार वर तोंड सुख घेत होते महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं. याला राज्यसरकारचं जबाबदार असल्याचा आरोप करत होते. मग आता केंद्रसरकारने ओबीसीचा एम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला त्यावर ही नेते मंडळी का बोलत नाही. केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर का उतरत नाही.का आंदोलन करत नाहीत. केवळ राजकीय भाकरी भाजण्याचं काम ही नेते मंडळी करत अहेत. त्यांना समाजाचं काहीच देणं घेणं नाही.

समाजाच्या नावाने राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांना समाजाने घरचा रस्ता दाखवला पाहिजे. ओबीसीवर अन्याय होत आहे म्हणणाऱ्या भाजपातील नेत्यांनी भाजपमधील सर्व पदांचा त्याग करायला पाहिजे. जर समाजावर अन्याय होत असेल तर तिथे कशाला राहायचं.कारण ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिला केंद्रातील भाजप सरकारने. एम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला भाजपा सरकारने. मग ओबीसीवर अन्याय कोण करत आहे तर केंद्रातील भाजपा सरकार.मग अशा पक्षांमध्ये अशा सरकार मध्ये ओबीसी नेत्यांनी का रहावे. याचं आत्मपरीक्षण भाजपातील ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाजान सुद्धा केलं पाहिजे.

Central government's refusal to conduct caste-wise census of OBCs and provide empirical data; why are OBC leaders silent?

 There has been a demand for a caste-wise census of OBCs in the country for many years.  A caste-wise census will reveal the caste statistics of OBCs and the exact population of OBCs in the country. Accordingly, the share of OBCs in politics, jobs and education will be determined.  The BJP government at the Center is not ready to conduct a caste-wise census of OBCs for fear of termination.


 BJP's OBC leader silent for selfish reasons?

 A resolution was tabled in Parliament stating that the OBC census would not be conducted. At that time, no BJP MP or minister opposed or objected to the resolution.  In particular, when there were 27 OBC cabinet ministers in the BJP government at the Center, everyone agreed in favor of the resolution.  Why all the OBC leaders were silent.  Why didn’t the OBC leaders protest when the government was taking decisions against the interests of the OBCs.  Despite knowing that the society is being harmed politically, academically and in jobs for its own benefit, the leader had turned a blind eye.  There are only symptoms of a selfish leader.


 After the Supreme Court canceled the political reservation of OBCs in Maharashtra, the OBC leaders of BJP were taking pleasure in the state government.  He was accusing the state government of being responsible for this.  So now why don't these leaders talk about the central government's refusal to provide OBC's empirical data.  Why don't they take to the streets against the central government. Why don't they protest.  These leaders are only baking political bread.  They have nothing to give to society.


 The society should show the way home to the leaders who are making a living by doing politics in the name of the society.  BJP leaders who say injustice is being done to OBCs should resign from all BJP posts.  If there is injustice in the society, then why stay there.  The BJP government refused to provide empirical data.  Then who is doing injustice to OBCs is the BJP government at the center. Then why should OBC leaders stay in such a government in such parties.  This should be introspected by the OBC leaders of BJP and also the OBC community.
Previous
Next Post »