Rajasthan MIG-21crash : राजस्थानमधील जैसलमेर जवळ भारतीय हवाई दलाचे MIG -21 हे लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना रात्री उशीरा घडली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार भारत पाकिस्तान सीमेजवळ हा आपघात झालेला आहे. या अपघातात विमान पायलट (चालक ) विंग कमांडर हर्षित सिन्हा शहीद झाले असल्याची माहिती मिळाली आहे . या बाबतची माहिती रात्री उशिरा भारतीय हवाई दलाने ट्विट करुन दिली आहे.
MIG-21विमानाचा अपघात हा राष्ट्रीय उद्यान परिसरातील वाळवंटात झाला आहे. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून , ही जागा साम पोलीस ठाण्याअंतर्गत येते. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत .
भारतीय हवाई दलाने या आपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon