योगी आणि मोदी कायम राहणार नाहीत ; नंतर तुम्हाला कोण वाचणार?, पोलिसांना धमकी दिल्याचा विडिओ वायरल

योगी पुन्हा मठात आणि मोदी हिमालयात जातील तेव्हा तुम्हाला कोण वाचवणार -असदुद्दीन ओवेसी 

UP rally : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एका प्रचारसभेत ओवेसी यांनी पोलिसांना धमकीवजा इशारा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओवेसींनी स्पष्टीकरण दिलं असून आपण पोलिसांना ही धमकी दिली नसल्याचं म्हटलं आहे. आपल्या भाषणातील मोजका भाग एडिट करुन व्हायरल करण्यात आल्याचं ओवेसीनी म्हटलं आहे 
असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून मुस्लीमांवर अत्याचार होत आहे, असं सांगत ओवेसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांना धमकी दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे करण्यात आला आहे . ‘योगी आदित्यनाथ हे नेहमी मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदी हे नेहमी पंतप्रधान राहणार नाहीत. पोलिसांकडून मुस्लिमांवर अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही हा अन्याय लक्षात ठेवू. अल्लाह तुम्हाला त्याच्या शक्तीने नष्ट करेल. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार?,’ असे ओवेसी म्हणाल्याचा दावा विरोधक करत असल्याचे पहायला मिळत आहे
असदुद्दीन ओवेसींचं स्पष्टीकरण-
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाद निर्माण होत असल्याचे पाहून ओवेसी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ओवेसी यांनी आपल्या भाषणातील काही भाग काढून व्हायरल करत चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या ४५ मिनिटांच्या भाषणातील एक मिनिटांचा व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आला असं ते म्हणाले आहेत.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng