पाण्यासाठी पुण्यातील 4 गावांचा धडक हंडा मोर्चा
पुणे : शिवणे, उत्तमनगर. कोंढवे आणि कोपरे या गावातील पाणी टंचाई, कमीदाबाने होत असलेला पाणी पूरवठा आणि भरमसाठ येणारे बील याच्या विरोधात निषेध करत उत्तमनगर येथे धडक हंडा मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना ही पुणे म न पा कडे त्वरित हस्तान्तरीत करावी व पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. याकरिता शनिवारी (23 एप्रिल) रोजी सकाळी 10:00 वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चा अहिरेगेट शिवणे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोंढवे, धावडे पर्यंत धडक हंडा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात चारही गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या हंडा मोर्चात आमदार भीमराव तापकीर,सुशील मेंगडे,किरण बारटक्के,वृषाली चौधरी,अरुण दांगट,वासुदेव भोसले तसेच पंचायत समिती सदस्या उषा नाणेकर,स्मिता धावडे,शिल्पा जोशी,सवर्ण ढगे,भारती वांजळे,उमेश पाटील,प्रवीण दांगट,सुभाष शिंदे,प्रकाश साळवी,संदीप देशमुख,सुरेश नाणेकर,सचिन कांबळे,भगवान मोरे, मोहन गायकवाड,बबन शेलार,रवी कदम,आणि विजय इंगळे यांच्यासह नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
मोर्चात सहभागी चारही गावांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी मागील 4 वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपा यांच्यातील वादामुळे या गावातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा याकरिता शेवटी हंडा मोर्चा काढावा लागला आहे.जर यापुढे पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मनपा वर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा सुभाष नाणेकर यांनी दिला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon