जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला ; एक जन ठार तर दोन मजदूर जखमी

      (फाईल -फोटो )
जम्मू काश्मीरच्या पुलवामा मध्ये दहशत वाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 1 ठार 2 जखमी, नाका बंदी सुरु.
जम्मू काश्मीर : पुलवामा जिल्ह्यातील गदुरा भागात दहशत वाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असल्याचे वृत्त आहे.या ग्रेनेड हल्ल्यात एका मजूराचा मृत्यू झाला आहे तर दोन मजूर जखमी झाले आहेत.मृत मजुराचे नाव मोहमद मुमताज असे असून तो मूळचा बिहार राज्यातील असल्याचे समजते.
https://banksathi.page.link/XUWh

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृत्यू झालेला मजूर हा बिहार राज्यातील साकवा पासरा येथील रहिवाशी असून त्याचे नाव मोहमद मुमताज असे आहे.या घटनेत जखमी झालेल्यांची नावे मोहमद आरिफ आणि मोहमद मजबूल अशी असून हे दोघेही बिहार राज्यातील रामपूर येथील रहिवाशी आहेत.


जखमीन मजुरांची प्रकृती सध्या स्थिर आहे.असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.या घटने नंतर या भागात नका बंदी सुरु करण्यात आली आली आहे. मूळचे जम्मू काश्मीरचे नसलेल्या पण तेथे व्यवसायासाठी गेलेल्या नागरिकांवर मागील काही दिवसापासून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या.मध्यंतरी या घटना थांबल्या होत्या. मात्र आता पुन्हा दहशत वाद्यांनी ग्रेनेड हल्ला करून बिहारी नागरिकांना लक्ष्य केलं आहे. या नंतर तेथील यंत्रणा सतर्क झाली आहे.
Previous
Next Post »