परभणी : 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज 15 ऑक्टोबर रोजी परभणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर महावंदना संपन्न झाली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला हिंदू धर्माचा त्याग करून नागपूर याठिकाणी पाच लाखाहून आधीक जन समुदाया समोर बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन उपस्थित सर्व लोकांना धम्मदिक्षा दिली.धम्म प्रचार आणि प्रसाराचं चक्र या दिवशी गतिमान करण्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली आणि तेव्हा पासून धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला जात आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन आंबेडकरी अनुयायासाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. देशात सर्वत्र धम्मचक्र प्रवर्तन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.त्याचाचं एक भाग म्हणून परभणी शहरात अनेक वर्षांपासून महावंदनेचा कार्यक्रम घेतला जात आहे.
परंतु कोरोनाकाळात या महावंदनेला खंड पडला होता. त्यानंतर आज पुन्हा महावंदनेला सुरुवात झाली. महावंदना सुकाणुसमिती प्रमुख प्रतिनिधी विजयराव वाकोडे व भदंत डॉ उपगुप्त महास्थ्वीर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले व भारतीय बौद्ध महासभा शाखा परभणीच्या वतीने पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यात आली.परभणी शहराच्या महापौर सौ. अनिताताई सोनकांबळे, भदंत डॉ उपगुप्त महास्थ्वीर आणि विजयराव वाकोडे यांनी प्रतिनिधिक स्वरूपात तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं.
भदंत डॉ उपगुप्त महास्थ्वीर यांनी वंदना घेऊन उपस्थित आंबेडकर अनुयायांना बावीस प्रतिज्ञाचे पालन करण्याची शपथ दिली.समता सैनिक दलाच्या वतीने पथ संचलन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक तसेच धार्मिक संघटनाचे पदाधिकारी व आंबेडकरी जन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
ConversionConversion EmoticonEmoticon