कोरोनाच्या पार्शवभूमीवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू


महाराष्ट्रात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या पार्शवभूमीवर 31 डिसेंबर पासून नवे कठोर निर्बंध लागू 
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने होणारी वाढ तसेच ओमायक्रोनची रुग्ण संख्या वाढत असल्याने गुरुवारी रात्री उशीरा राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि प्रशासकी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना परिस्थितीवर आढावा घेण्यात आला आला.राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नव्या कोरोना रुग्णांची नोद झाली असून त्यात फक्त एकट्या मुंबई मध्ये 3 हजार 671रुग्ण आढळून आलेले आहेत.

31 डिसेंबर च्या पार्शवभूमीवर जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.लग्न समारंभात 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे.कोरोनाच्या परिस्थितीअनुसार स्थानिक पातळीवर अधिक कडक  निर्बंध लागू करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात कोणत्याही सार्वजनिक स्थळी, पर्यटन स्थळी,बीच, गर्दीची ठिकाणे, मोकळ्या जागा, खुली मैदाने या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.संबंधित ठिकाणच्या प्रशासनाने जमाव बंदीचे कलम 144 लागू करून मोकळ्या किंवा बंदिस्त ठिकाणी पार पाडल्या जाणाऱ्या लग्नसमारंभात 50 लोकांची उपस्थिती तर अंत्यविधीच्या कार्यक्रमाला 20 लोकांना उपस्थितीत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या किंवा बंदिस्त ठिकाणी आयोजित केलेले असतील तर अशा कार्यक्रमाला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना परिस्थिती वर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यात ओमायक्रोनचा संसर्ग वाढल्यास उपचारासोबत अन्य कोण कोणते उपाय करता येतील या पार्शवभूमीवर गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत चर्चा केली होती.लोकं काळजी घेत आहेत त्यावरचे उपाय करत आहेत.

 परंतु कोरोना संसर्ग वाढीचा वेग झपाट्याने वाढत असल्याने जास्तीत जास्त कोरोना चाचणी घ्यावी. संशयिताचा शोध, तसेच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.तसेच राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सरकारी व खासगी दवाखान्यात मनुष्य बळाची तयारी कवी लागेल जेणेकरून प्रत्येक रुग्णांला वेळेत उपचार मिळतील.अशा प्रकारचे नियोजन करा आणि प्रत्येक अंमलबजावणीची तयारी ठेवा.असे अहवान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाला केले आहे.


Previous
Next Post »