जम्मू काश्मीरच्या राजौरी मध्ये आत्मघाती हल्ल्याचा कट उधळून लावताना तीन जवान शहिद तर 2 अतिरेक्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील परहाल मध्ये लष्करी छावनीत दोन अतिरेकी घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ठार करण्यात आले आहे. मात्र या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.लष्करी तळावर आत्मघाती हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतिरेक्यांनीशी सुरक्षा जवानांची चकमक झाली.या चकमकीत भारतीय लष्कराचे 5 जवान जखमी झाले आहेत.राजौरी पासून 25 किमी अंतरावर दरहाल भागातील परहाल मध्ये लष्करी छावणी आहे.छावणीच्या कुंपनातून आत मध्ये घुसण्याचा दोन अतिरेकी प्रयत्न करत असताना ही बाब लष्करी जवानांच्या लक्षात आली. त्यानंतर लष्करी जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली.लष्करी जवानांनी दोन्ही अतिरेक्यांना ठार करून आत्मघाती हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.
या घटनेनंतर सहा किमी परिसरात अतिरिक्त सुरक्षारक्षक बल तैनात करण्यात आले असून या संपूर्ण परिस्थितीवर लेफ्टनंट कमांडर जनरल मनजिंदर सिंग हे लक्ष ठेवून आहेत.दरम्यान जखमी जवानांना सैन्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी जम्मू काश्मीरच्या बडगाम मध्ये एलईटी तीन अतिरेक्यांना भारतीय जवानांनी ठार केले होते.यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा ईशारा जवानांकडून देण्यात आला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon