Pune crime : अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर शस्त्र विरोधी पथकाची कार्यवाही ; 3 कोयत्या सह आरोपीला अटक

पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याची हद्दीत अवैध शस्त्र वागणाऱ्या आरोपीस शस्त्र विरोधी पथकाने केली अटक 
पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हद्दीत दि 22 जुलै 2022 शुक्रवार रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर शस्त्र विरोधी पथकाने कार्यवाही करत 3 कोयत्यासह आरोपीला केली अटक. शस्त्र विरोधी पथकातील पो हवा वशिम शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती कि,कस्पटे वस्ती वाकड येथील लेबर कॅम्प जवळ वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अतिष उर्फ डिग्या युवराज राजेगावकर (वय 20 रा.कैलास नगर कॉलनी नं 3 थेरगाव काळेवाडी ) याच्या सोबत इतर दोन साथीदार कोयते घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत.

गुप्त माहिती मिळाल्या नंतर तात्काळ शस्त्र विरोधी पथकाने सापळा रचून आरोपी अतिष राजेगावकर यास ताब्यात घेण्यात आले. परंतु अतिष असलेले त्याचे साथीदार अनिकेत खाडे व वशिम शेख हे दोघे त्यांच्याजवळील लोखंडी कोयते सोडून पळून गेल्यामुळे दोन साक्षीदारा समक्ष पंचनामा करून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

सादर आरोपीकडे हत्यार आढळून आल्याने व अवैध हत्यार बाळगण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांचा मनाई आदेश असताना व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 73 (1)व (3) सह 135 अनुसार तसेच भारतीय हत्यार कायदा  1951 चे अधिनियम कलम 4 (25) प्रमाणे वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासाठी आरोपीला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सादर ची कार्यवाही शस्त्र विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली स. फौजदार शामराव शिंदे, स. फौजदार लखनकुमार वाव्हळे,पो. हवा. प्रीतम वाघ,पो हवा वडेकर,वाशिम शेख, व मोसीन आत्तार यांनी ही कार्यवाही केली आहे.
Previous
Next Post »