अर्थ संकल्पच्या पुरवणी मागणीत याबाबत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.वैद्यकीय महाविद्यालयात 448 पदांची भरती केली जाणार असून त्यासाठी 17 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश सोमवारी राज्याच्या वैद्यकीय विभागाने काढला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात संलग्न 430 खाटांच्या रुग्णालयात 1 हजार 86 विविध पदे भरली जाणार आहेत.त्यासाठी 109 कोटी 19लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण 682 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी 309 कोटी 62 लाख रुपये केवळ बांधकामासाठी देण्यात येणार आहेत.यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकी इमारतीसाठी 33 कोटी 15 लाख. अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विभागासाठी 15 कोटी 60 लाख, रुग्णालयच्या इमारतीसाठी 109 कोटी 60 लाख, अधिकारी-कर्मचारी आवास तसेच विद्यार्थी वसतिगृसाठी 110 कोटी 89 लाख व आवशक्तेनुसार अतिरिक्त बांधकामासाठी 40 कोटी 39 लाख रुपायांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon