विवाहित जोडप्याच्या आयुष्यात तिसरा व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही - दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली : पतीपत्नी म्हणून राहत असलेल्या जोडप्यांच्या आयुष्यात कोणी तिसरा व्यक्त हस्तक्षेप करत असेल तर त्या व्यक्तीला कायद्याने अटक करण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.विवाहित जोडप्यांच्या संरक्षण करणे हा राज्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करत विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात कोणी तिसरा व्यक्ती हस्तक्षेप करीत असेल तर त्याला अटक करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने या निर्णयात दिले आहेत.अशा प्रकारचा निकाल न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी दिला आहे.एका पीडित महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यात तिने सांगितले होते की घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे घरच्यांच्या दबावामुळे मला घर सोडून जावा लागले असून मला बाहेर राहावे लागत आहे.तसेच पीडित महिलेचे वडील हे उत्तर प्रदेशातील मोठे राजकीय व्यक्ती आहेत. परिवाराच्या आणि नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आपल्याला घर सोडावे लागले असल्याचे पीडित महिलेने याचिकेत सांगितले होते.
या प्रकरणात न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की,देशातील विवाहित जोडप्यांचे संरक्षण करण्याचे आदेश देण्याचा अधिकार राज्यांना आहेत असं सांगत जोडप्यामध्ये कोणी तिसरा व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही.असं न्यायमूर्ती तुषार राव गेदेले यांनी निर्णय देताना सांगितलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon