पुण्यात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास शस्त्र विरोधी पथकाने केली अटक
पुणे : पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकातील सा.पो उपनिरीक्षक शामराव शिंदे, सा.पो उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे,पो हवा. प्रीतम वाघ,पो.हवा. वडेकर पो हवा. शेख, पो अंमलदार शेळके व पो कॉ मोसीन आत्तार हे दि 19 जुलै 2022 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करणेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील हद्दीत गस्त घालत असताना एक तरुण तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पो हवा. प्रीतम वाघ यांना मिळाली होती.वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्र गुन्ह्यातील आरोपी सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघेरे (23 रा.शिवतांडव कॉलनी वाकड पुणे ) हा कंबरेला एक तलवार लावून फिरत असून तो गंभीर गुन्हा करण्याची शक्यता आहे.अशी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार लगेच त्याला ताब्यात घेण्याचे आदेश देऊन सापळा लावून सादर आरोपीस ताब्यात घेण्यात आले व दोन पंचांच्या साक्षीने आरोपीकडील तलवार हस्तगत करण्यात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली.
भारतीय हत्यार अधिनियम कलम 4 (25) तसेच पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951चे कलम 37 (1)व (3) प्रमाणे वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon