नांदेड : भोकर-हिमायतनगर रोडवर दुचाकी व 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात ; 2 जन ठार तर, 2 जन गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यातील सरसम येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी 
नांदेड : जिल्ह्यातील भोकर - हिमायतनगर हायवेवर  मौजे सरसम गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ 16 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकी आणि कारची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणखी दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम आरोग्य केंद्रा जवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच 44 जी. 1882 )ने दुचाकी (क्र.एमएच 26 एच 8461) ला जोराची धडक दिल्याने वाळकेवाडी येथील गंगाधर माझळकर व केरबा हुरगुते या दोघांचा आघातस्थळीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हिमायतनगर येथील आठवडी बाजार करून घरी परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
Previous
Next Post »