पैठण तालुक्यातील गोपाल थावर या 12 वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या पूर्वसंध्येला गळफास घेऊन केली आत्महत्या
पैठण : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये मूरमा गावातील 12 वी मध्ये शिकणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. गोपाल साहेबराव थावर (वय 18 रा.मुरमा ता.पैठण )असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.परीक्षेच्या आदल्या दिवशी गोपाल ने आत्महत्या केल्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. गोपालच्या आत्महत्येमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबतची अधिक माहिती घेतली असता 3 मार्च रोजी गोपाल थावर याचे घरातील सर्व सदस्य शेती कामासाठी सकाळी गेले होते. गोपाल ची 4 मार्चला 12 वी ची परीक्षा असल्याने तो घरीच होता. सायंकाळी गोपाल चा चुलत भाऊ ज्ञानेश्वर थावर हा शेतातून घरी आला तेव्हा घराचे दार आतून बंद होते. तेव्हा त्याने घरावर जाऊन पतर उचलून पाहिले असता त्याला गोपालने घरातील पत्राखालील अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर या घटनेची ग्रामस्थांना आणि पोलीस पाटील यांना देण्यात आली.
या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस घटना स्थळी दाखल झाले.त्यांनी गोपालला खाली उतरून घेतले आणि तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र तपासणी केल्यावर गोपालचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon