देशात अराजक्ता माजवणाऱ्यावर पोलीस काय कार्यवाही करणार
युवा पिढी देशाचे भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. त्यासाठी चांगल्या शिक्षणाची आणि चांगल्या संस्काराची गरज असते. चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार हे स्वतः ची प्रगती करू शकते.चांगले शासन व प्रशासन देऊन देशाची प्रगती व उन्नती घडवू शकते. म्हणूनच देश हितासाठी उच्च शिक्षण आणि सुसंस्कार असलेली युवा पिढी घडविणे देशातील प्रत्येक जाती धर्मातील कुटुंबाची प्रथम जबाबदारी आहे. तेंव्हाचं भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दंगल मुक्त आणि राष्ट्रीय एकात्मता असलेला सुजलाम सुफलाम भारताची निर्मिती होईल.मात्र इथे धर्माच्या नावाखाली लहान लहान मुलांना शस्त्र चालवण्याचे व बाळगण्याचे खुलेआम प्रशिक्षण दिले जात आहे. दुसऱ्या धर्माचा द्वेष म्हणून अशा प्रकारची लहान मुलांच्या कोवळ्या मनावर जातीयद्वेष निर्माण करण्याचे बिंबविल्या जात आहे. अशा प्रकारची मानसिकता देशात अराजक्ता व दुफळी निर्माण करणारी आहे. देशात एका धर्माचे वर्चस्व रहावे त्यासाठी धर्माचे ठेकेदार हे सर्व करू पहात आहेत. परंतु यामुळे देशाचे कुठलेच हित साधनारे नाही. उलट देशात धार्मिक द्वेष भावना वाढली जाईल आणि धार्मिक दंगे वाढले जातील. त्यामुळे देशात अराजक्ता माजेल आणि देश रक्तपताच्या दिशेने वाटचाल करायला लागेल.
देशात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी हा देशातील तरुणांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यावर काही उपाय योजना करून तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी तरुणांना धार्मिक युद्धात ढकलून देणे योग्य नाही. देशातील कुठल्याही धर्माच्या ठेकेदारांनी तरुणांना अशा प्रकारच्या चुकीच्या मार्गाला लावू नये. धर्माच्या नावाखाली तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त करू नये. आज इथे हे लिहिण्याचे कारण कि अजय चौधरी नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून एक फोटो शेअर केला असून त्यात बरीच तरुण मुलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसत आहे. आणि तो म्हणतो की समाधान केवल एक म्हणजे हिंदू धर्म रक्षणासाठी शस्त्र हातात घेणे हा एकमेव पर्याय आहे. असं तो म्हणतो आहे.सरकार या संबंधित प्रकरणावर काय कार्यवाही करते ते मात्र बघावे लागेल. परंतु अशा प्रकारे देशात अराजक्ता मजवणाऱ्यावर कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे.
संपादकीय...
ConversionConversion EmoticonEmoticon