परभणीत धम्मचक्र प्रेरणा अभियानांतर्गत 355 बुद्ध मूर्तीचे सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्याकडून वाटप

परभणीत सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या कडून पंचधातूच्या 355 बुद्ध मूर्तीचे वाटप 
परभणी :परभणीत धम्मचक्र प्रेरणा अभियानांतर्गत व्हिएतनाम येथून आणलेल्या पंचधातूच्या 355 बुद्ध मूर्तीचे सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्याकडून वाटप करण्यात आले.शनिवार 12 मार्च रोजी सायंकाळी अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मूर्तीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात म्हटले आहे की,जिथं बुद्ध विचार नाही तिथं युद्ध आहे. तथागत गौतम बुद्धानी जगाला शांततेचा संदेश दिला आहे. जगाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. जिथे बुद्धांचे विचार नाहीत तिथे आज युद्ध होत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज परभणीत तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तिचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानापटोले, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे  राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटीया, आमदार सुरेश वरपुडकर,तुकाराम रेंगे,सुरेश देशमुख,संजय राठोड, देवानंद पवार, नितीन गजभिये विजय वाकोडे,बाळासाहेब देशमुख,अनिता सोनकांबळे,भगवान वाघमारे,सुरेश नागरे, हरिभाऊ शेळके, सिद्धार्थ भालेराव,नदीम इनामदार,रवी सोनकांबळे,गौतम मुंढे,विखार लाला, रविराज देशमुख, जयश्री खोबे,आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बुद्ध भीम गीतांचा प्रबोधन पर कार्यक्रम झाला. या वेळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. मंगल कार्यालतील जागा कमी पडल्याने नागरिकांनी बाहेर थांबून आनंद शिंदे यांच्या बुद्ध भीम गीतांचा आस्वाद घेतला.
Previous
Next Post »