झापोरोजिया अनुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट झाला तर चेरनोबिल पेक्षा 10 पट अधिक विध्वन्स ; तज्ञांनी भीती केली व्यक्त


युक्रेन मधील झापोरोजिया पॉवर प्लांटवर रशियचा गोळीबार, जगावर अंधाराचे सावट येण्याची भीती 
युक्रेन मधील झपोरोजीया अनुऊर्जा प्रकल्पला आग लागली असल्याची माहिती युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी दिली आहे.याबाबत ची माहिती ओरलोव्ह यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिलं की अनुऊर्जा प्रकल्पाला लागेल्या आगीमुळे सर्व जगाला याचा मोठा धोका निर्माण होणार आहे.रशियाने इमारतीवर केलेल्या गोळीबारामुळे अनुऊर्जा प्रकल्प आगीच्या कचाट्यात सापडले आहेत.

ओरलव्ह यांनी पुढे म्हटलं आहे की यावरील हल्ला तात्काक थांबविण्यात यावा. तज्ञाच्या मतानुसार या प्रकल्पाला अधिक आग लागली तर रेडियशनचा धोका निर्माण होऊ शकतो आणि जर असं झालंच तर संपूर्ण मानव जातीसाठी सर्वात मोठा विध्वन्स ठरेल.झापोरीजिया अनुऊर्जा प्रकल्पाची आग आधीच भडकलेली आहे. जर याचा स्फोट झाला तर तो चेरनोबिलपेक्षा 10 पट अधिक मोठा असेल असं ओरलव्ह यांनी म्हटलं आहे.

झापोरोजिया अनुऊर्जा प्रकल्पातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार युरोप मधील सर्वात मोठ्या अनुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैनिकांनी गोळीबार सुरु केला आहे. देशातील विजेच्या उत्पादनापैकी एक चतुर्थांश वीज युक्रेन मधील या प्रकल्पातून निर्माण होते.झापोरोजिया हा भाग पूर्व युक्रेन मधील निपर नदीवर वसलेलं एक शहर आहे.

झापोरोजिया अनुऊर्जा प्रकल्पावर जर रशियाने पूर्णपणे ताबा घेतल्यास युक्रेन चे राष्ट्रध्यक्ष झेलेंस्की यांना रशिया विरोधात खंबीर पणे उभं राहणं कठीण होऊन जाईल असं तज्ञ मत व्यक्त करत आहेत. त्याच बरोबर जगावर अंधाराचं सावट निर्माण होण्याची भीती आहे.
सद्य स्थितील युक्रेन सैन्य शहराच्या बाहेर रशियन सैन्याशी निकराने लढत असल्याचे दिसत आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng