पुणे : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या 23 वर्षीय तरुणास शस्त्र विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या


पुण्यातील वाकड परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या 23 वर्षीय तरुणास पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या 
पुणे : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या इसमास शस्त्र विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या. दि.24 मे रोजी एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस कॉ. प्रवीण मुळूक यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ही माहिती शश्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना कळवली.त्यांनी तात्काळ पिस्टोल घेऊन फिरणाऱ्या इसमास ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

 शस्त्र विरोधी पथकातील पो.उप.नि.भरत गोसावी, पो.हा.चंद्रकांत गवारी,पो कॉ.प्रवीण मुळूक, पो कॉ.मोसीन आत्तार,पो.कॉ. शेळके यांनी सपळा रचून ऋषिकेश उर्फ मोन्या श्यामराव वाघेरे (वय 23 रा.कस्पटे वस्ती ) याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी वाकड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे,अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे,   पो.उपायुक्त गुन्हे श्री काकासाहेब डोळे, सा.पो.उपायुक्त श्री प्रशांत अमृतकर,सा पोलीस उपायुक्त पद्माकर घनवट पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनसखली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,सा.पो उपनिरीक्षक शामराव शिंदे,सा पो उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे,पो.हवा चंद्रकांत गवारी,पो.हवा .प्रीतम वाघ,पो हवा. शेख,पो. हवा. वडेकर,पो कॉ प्रवीण मुळूक,पो कॉ मोसीन आत्तार,पो कॉ शेळके व गुन्हे शाखा पथक यांनी ही कार्यवाही केली आहे.




Previous
Next Post »