निवडणूक हरणाऱ्या पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज, विशेष करून मायावती यांना आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज
मुंबई : देशाचं लक्ष लागून असलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी लागले.पाच पैकी चार राज्यात भाजपाने विजयाचा झेंडा फडकावून जोमात आहे तर काँग्रेस, बसपा आणि सपा कोमात गेली आहे. पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला धोबी पच्छाड देत विजयी पताका फडकवली.या निवडणुकात भाजपा विरोधात लढाणाऱ्या पक्षांपैकी एकमेव आम आदमी पक्षाने विजय संपादन केला आहे. परंतु तिथे भाजपाचे काहीच नुकसान झाले नाही. काँग्रेस पक्षाने तेथील सत्ता गमावली आहे.म्हणजे काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य गेलं. मणिपूर, उत्तराखंड, गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजपाने सत्ता राखली आहे.या निवडणुकीत देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजप सत्तेवर आली आहे. 37 वर्षानंतर पहिल्यांदाचं उत्तर प्रदेशच्या जनतेनं एका पक्षाला सलग दोन वेळा सत्ता दिली आहे.इथे भाजपा विरोधात लढणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष चारी मुंढ्या चित झाले आहेत.अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने 125 जागा जिंकून कशीबशी लाज राखली आहे. काँग्रेसला 2 जागेवर आपला घाशा गुंडाळावा लागला तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा चुराडा झाला आहे.
मायावती यांना विशेष आत्मपरीक्षण करण्याची गरज
चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या मायावती यांना 1 जागा जिंकता आली.या निवडणुकीत पराभव झालेल्या सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विशेष करून बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांना आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे.2007 मध्ये बसपाला 202 जागा मिळाल्या मायावती यांचं पूर्ण बहुमताचे सरकार बनवले होते.
2012 मध्ये अखिलेश याद मुख्यमंत्री झाले. मायावती यांना 84 जागा मिळाल्या होत्या.2017 मध्ये भाजपाने सत्ता मिळवली आणि बसपाला अवघ्या 19 जागा जिंकता आल्या होत्या.2022 च्या निवडणुकीत बसपाचा पार चुराडा झाला केवळ 1 जागा जिंकता आली. ही बाब मायावती यांच्यासाठी धक्का दायक आहे. भाजपा कशी जिंकली हे सांगत बसण्यापेक्षा बसपाचा पराभव का झाला कोणत्या गोष्टीत चुका झाल्या. आपण कुठे कमी पडलो. कोणती धोरणं चुकली या गोष्टीवर आत्मपरीक्षण करण्याची मायावती यांना अत्यन्त गरज आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon