धक्कादायक: अंधारामुळे मुलगा समजून बापाचा केला खून


शिरूर मध्ये वैमानस्यातून चुकून मुला ऐवजी बापाचा गेला बळी 
पुणे :  शिरूर तालुक्यातील बाभूळसर येथे 5 मे रोजी रात्री खुनाची घटना घडली आहे. या खुणाच्या घटनेत मुलाच्या पूर्व वैमानस्यातून बापाचा खून झाला आहे. आरोपिंनी अंधारामध्ये मुलगा समजून बाहेर वट्यावर झोपलेल्या बापाचा धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या दोन दिवसात तपास लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मुला ऐवजी बापाचा चुकून खून झाल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीनी दिली आहे. जालिंदर ढेरे (वय 50 रा. बाभूळ सर खुर्द ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर निखिल थेऊरकर (रा. कर्डे ता. शिरूर ) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.या खून प्रकरणी आरोपीला 12 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबतची माहिती रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली आहे.

जालिंधर ढेरे हे 5 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बाभुळसर खुर्द येथे आपल्या घरासमोरील ओट्यावर  झोपले होते.ते झोपेत असताना आरोपनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.याबाबतची फिर्याद अर्चना जालिंधर ढेरे यांनी पोलिसात दिली होती.घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी तपास सुरु केला.

घटनेचा ठोस पुरावा नसल्याने रांजणगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरु केला.पोलिसांना मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यात त्यांना काही सुगावा लागताच निखिल थेऊरकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे,पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, विनोद शिंदे,सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे,विलास आंबेडकर, विजय शिंदे,उमेश कुतवळ,वैभव मोरे,वैजनाथ नागरगोजे,विजय सरजिने व माऊली शिंदे यांनी या प्रकरणी तपास कार्य करून खुनाचा उलगडा केला.

चुकून मुला ऐवजी बापाचा गेला बळी 
जालिंधर ढेरे यांचा मुलगा उत्कर्ष ढेरे  आणि निखिल थेऊरकर यांची ओळख होती.एका व्यक्तीवर हल्ला करण्याबाबतीत काही दिवसापूर्वी फोनवर संभाषण झाले होते. या दोघांमध्ये झालेले संभाषण उत्कर्ष याने इतर मित्रासाह ज्याच्यावर हल्ला होणार आहे त्याला देखील पाठवले होते. याचा राग मनात धरून निखिल थेऊरकर याने उत्कर्ष ढेरे याचा काटा काढण्याचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी उत्कर्षला मारण्यासाठी कोयता घेऊन रात्री त्याच्या घरी गेला. बाहेर ओट्यावर उत्कर्षचे वडील जालिंधर ढेरे झोपले होते.रात्री अंधार असल्याने ओट्यावर उत्कर्षच झोपलेला आहे असं समजून जालिंधर ढेरे यांच्यावरच कोयत्याने वार केले.
Previous
Next Post »