भोईसर रेल्वे स्थानाकातून 8 महिन्याचे मुलीचे अपहरण, 8 तासात आरोपीला बेड्या, चिमुकलीची सुखरूप सुटका
पालघर : पालघर जिल्ह्यातील भोईसर रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे मजुराच्या 8 महिन्याच्या मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली. मुलगी कपड्याच्या झोळीत झोपली असताना अज्ञतानी तिचे अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी चिमुकलीच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पालघर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या 8 तासात अपहरण कर्त्याला पकडले.अपहरण कर्त्याच्या तावडीतून चिमुकलीची सुटका करण्यात आली असून तिला सुखरूप तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलं आहे.या घटनेचा पुढील तपास पालघर लोहमार्ग पोलीस करत आहेत.वर्षा कन्हैया डामोर असे फिर्यादी रेल्वे मजूर महिलेचं नाव आहे तर अपहरण झालेल्या चिमुकलीच महिमा असे नाव आहे. वर्षा आणि तिचा पती कन्हैया हे दोघेही रेल्वे मजूर आहेत. ते रेल्वे रुळाचे काम करतात. भोईसर रेल्वे स्थानाकवरील पादचारी पुलाखाली झोळीत महिमा या 8 महिन्याच्या चिमुकलीला झोपी घातले होते. त्यानंतर डामोर दाम्पत्या तिथून कामावर निघून गेले होते.त्यानंतर साडे अकराच्या दरम्यान मुलीचं अपहरण झाल्याचे लक्षात आले.
झोळीत महिमा ही चिमुकली नसल्याचे डामोर यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्या महिलेने चिमुकलीची आई वर्षा यांना सांगितले.झोळीत मुलगी नसल्याचे पाहून वर्षा यानी आरडाओरड करत टाहो फोडला.मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भोईसर रेल्वे पोलिस ठाण्यात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.
अपहरण प्रकरणी पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी नरेश रणधीर यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली.त्यांनी चिमुकलीच्या अपहरणाची माहिती रेल्वे पोलीस तसेच गृह रक्षक दलाला दिली. दरम्यान मुरबे येथून रेल्वे स्थानाकडे कामासाठी जात असताना गृह रक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक व्यक्ती लहान बाळ घेऊन जाताना पाहिलं. त्यांनी त्या बाळाचा फोटो काढून पोलीस ठाण्यात पाठवला असता आपहरण झालेलं बाळ माझंच असल्याची मुलीच्या आईने सांगितले.त्यानंतर तात्काळ अतिरिक्त पोलीस बल पाठवून आपहरण कर्त्या आरोपीला पकडण्यात आले.
पोलिसांनी अवघ्या 8 तासात ही कार्यवाही करत आरोपीच्या मुसक्या अवळून ताब्यात घेतले. 8 महिन्याच्या महिमा या चिमुकलीची अपहरण कर्त्या आरोपी कडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तिला आई वर्षा आणि वडील कन्हैया यांच्या स्वाधीन केलं आहे. या प्रकरणी आरोपी ची कसून चौकशी करण्यात येत आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon