आदेश आलाय साहेबांचा ; पण जाताना एक मात्र करून जा


भोंग्यावरून बेधुंद झालेल्या तरुणाईला आपल्या कर्तव्याची जाणीव असावी 
राज्यात सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. लाखो तरुण बेरोजगार आहेत मात्र त्यांना आपण बेरोजगार असल्याची अजिबात खंत नाही. मस्जितीवरील भोंगे काढण्यासाठी मात्र आपल्या करिअर ची, आपली आणि आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आंदोलनात उतरतोय. अभ्यास करण्यासाठी किंवा दोन पैसे कमवण्यासाठी भल्या पहाटे उठणार नाही मात्र मस्जितीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी भल्या पहाटे उठतोय.

 दोन धर्मात धार्मिक तेढ निर्माण करण्यात आणि दंगली घडवून आणण्यात व राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात त्याला खूप मोठा पराक्रम केल्याचा आनंद वाटतो. पोलिसांचे दंडे खाण्याची, आपल्यावर पोलिसात गुन्हे दाखल होण्याची आणि भविष्यात आपल्या करिअर चे आणि कुटुंबाचे काय होईल याची अजिबात चिंता न करता केवळ मस्जिवरील भोंगे उतरविण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भडकावू भाषणाला बळी पडणाऱ्या तरुणांना एका "आईचा संदेश" काय आहे हे कविणे कवितेतून सदर केला आहे.

आदेश आलाय साहेबांचा आता तू
थांबणार नाही हे माहित आहे मला

म्हणूनच तुला मी आता अडवणार नाही,
पण जाताना एक मात्र करून जा...

अंधारात चाचपडती माय बाप तुझे
तू लाईटचे बील तेवढे भरून जा..

लेकरांच्या भविष्याचा उजेड आहे शाळा,
तू शाळेची थकीत फी तेवढी देऊन जा..

उद्या तू गेल्यावर कर्जदार उभे राहतील दारावर,
तू जाताना तेवढा कर्जाचा हप्ता चुकवून जा..

पकडलंच पोलिसांनी तुला दंगलखोर म्हणून,
तर जामीनाचे पैसे तेवढे ठेवून जा..

माझं काही नाही मी करेन चार घरची धुनीभांडी,
तुझ्या आईबापाच्या औषधांची तजबीज तेवढी करून जा..

धर्म रक्षणार्थ निघालास तू युद्ध करायला,
धर्माची व्याख्या तेवढी आम्हाला समजावून जा..
 या कवितेच्या माध्यमातून संदेश शालिनी संभाजी कर्डक यानी बेधुंद झालेल्या तरुणाईला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.

                                                   संपादकीय....

Previous
Next Post »