राज्यातील महाविकास आघाडी सरकारची अवस्था म्हणजे धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर 116,117 व 153 अशी थातूर मातुर गुन्हे केले दाखल 
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत मस्जितीवरील बंद करण्यासाठी 3 मे चा आलटीमेटम दिला होता.4 मे पासून मस्जितीवरील भोंगे बंद केले नाही तर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. औरंगाबाद मधील सभेला पोलीस प्रशासनाने काही आटी घालून परवानगी दिली होती. मात्र त्या आटीचे पालन राज ठाकरे यांच्या कडून करण्यात आले नाही.

 उलट भरसभेत हजारो लोकांसमोर मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिला मागचा पुढचा विचार न करता मस्जितीवरील भोंगे उतरलेच पाहिजे आणि जर ते ऐकत नसतील तर एकदा होऊनच जाऊ द्या अशाप्रकारचे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे चिथावणी खोर भाषण केलं आणि त्यानुसार मनसे कार्यकर्ते मस्जितीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याच्या तयारीस लागले आहेत.पोलीस प्रशासनाने मनसे कार्यकर्त्यांना काही ठिकाणी नोटीस बजावल्या आहेत, काहींना ताब्यात देखील घेतलं आहे.एवढं सारं होत असताना महाविकास आघाडी सरकार म्हणते कायदा हातात घेतल्यास कार्यवाही करू.

आता कोणता कायदा हातात घेणं बाकी आहे. मस्जितीवरील भोंगे उतरले नाही तर एकदा होऊनच जाऊ द्या अशी धमकीच राज ठाकरे यांनी भर सभेत दिली आहे. असे असताना पोलिसांनी 116,117 आणि 153 कळमांतर्गत थातूर मातुर अशा प्रकारचा राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत राणा दाम्पत्याला राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात टाकले मग राज ठाकरे यांनी दोन धर्मात तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवून कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर कलम 124 अ अनुसार गुन्हा दाखल का केला नाही.

कायदा सर्वांसाठी सामान आहे परंतु राज्यातील ठाकरे सरकार न्याय देण्याची बाबतीत दुटप्पी पणा ची भूमिका घेत आहे. आपलं म्हणजे बाबा आणि दुसऱ्याचं म्हणजे कारटं अशी वागणूक सरकार देतय. राज ठाकरे यांच्यावर कठोर कार्यवाही करून अटक केली तर राज्यातील परिस्थिती हातात बाहेर जाऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या भीतीने राज्यातील आघाडी सरकार राज ठाकरे यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यास घाबरत आहे. त्यामुळे सरकारची अवस्था धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशीच झाली आहे.
  
                                                संपादकीय.....
Previous
Next Post »