मुंबई : अभिनेत्री केतकी चितलेंना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने आता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. 2020 मध्ये अभिनेत्री केतकी चितळेनी बौद्ध धर्मविषयी सोशिअल मीडियावर आक्षेपहार्य विधान केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकारणात तिला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. केतकी चितळेवर शरद पवार यांच्या संबंधित आक्षेपहार्य मजकूर सोसिअल मीडियावर टाकल्या प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यासंबंधी केतकी चितळेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.रबाळे पोलिसांनी याबाबतीत यापूर्वीच केतकीचा जबाब नोंदवून घेतला असल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात सांगत तिला पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. मात्र याप्रकारणाचा अधिक तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही वाजूच्या वकिलांची बाजू ऐकल्या नंतर न्यायालयाने केतकी चितळेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पून्हा केतकी चितळेला न्यायालताने 7जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात रवानगी केली आहे.
केतकी चितळेवर आणखी एक गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी देखील आक्षेपहार्य मजकूर समाज माध्यमावर टाकल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. मात्र याचा निकाल 26 मे रोजी लागणार आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon