त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना अमरावती च्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थाना समोर हनुमान चालीसा वाचन करण्याचा हट्ट धरला. पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा वाचन करण्याचा हट्ट किती अंगाशी आला.
राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली 14 दिवस तुरुंगात काढावे लागले. मात्र ज्या राज ठाकरेंनी हिंदुत्वाची शाल पांघरून मस्जिवरील भोंगे काढण्याबाबत आणि मस्जितीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा मुद्दा उपस्थित करत दोन धर्मात धार्मिक तेढ निर्माण करणारे भडकावू भाषण केलं. त्या राज ठाकरे विरोधात मात्र राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही. जेंव्हा राणा दाम्पत्याला हे लक्षात आलं तेंव्हा आता आमदार रवी राणा यांनी राज ठाकरे यांच्यावर फिक्सिंगचा आरोप लावला आहे. आम्ही सामान्य कुटुंबात जन्मलो असल्यामुळे आमच्यावर राज द्रोहाचा गुन्हा दाखल आणि ते ठाकरे कुटुंबात जन्माल्यामुळे त्यांच्यावर राज द्रोहाचा गुन्हा नोंद होत नाही असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
राणा दाम्पत्य हे काही मनसेचं पदाधिकारी नव्हते तरी सुद्धा हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी काम करत असल्याचे भाजपाला दाखवण्यासाठी आणि भाजपा कडून शाबासकी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचन करण्याचा स्टंट केला. मात्र तो स्टंट राणा दाम्पत्याच्या अंगलट आला.14 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली. हनुमान चालीसाच्या मुद्यावरून महिला खासदाराला तुरुंगात टाकण्यात येते. याबाबत मात्र राज ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत.त्यामुळे रवी राणा यांनी राज ठाकरे वर फिक्सिंगचा आरोप लावला आहे.
राज्यातील जनतेच्या प्रश्नावर राणा दाम्पत्यांनी कधी एखादा स्टंट केला नाही. नवनीत राणा या एससी राखीव मतदार संघाच्या खासदार आहेत. त्यांनी कधी मागासवर्गीयांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवला नाही किंवा आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी सरकारच्या विरोधात मोर्चे आंदोलन केले नाही. आपण केवळ हिंदुत्वाचे समर्थक आहोत हे दाखवून भाजपाला खुश करण्याचा राणा दाम्पत्याचा स्टंट होता.ज्याच्या भरोशावर हिंदुत्वाच्या आंदोलनात उडी घेतली त्यांनीच थारा न दिल्याने तुरुंगात जावे लागले. राजकीय प्रवासात अतिघाई जीव संकटात नेयी असचं काहीसं याठिकाणी राणा दाम्पत्याच्या बाबतीत घडले आहे.
संपादकीय...
ConversionConversion EmoticonEmoticon