परभणी : गंगाखेड- परळी महामार्गावर गंगाखेड शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपा जवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकी स्वराला धडक दिली. या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना 23 मे रोजी दुपारी 2 वाजता घडली असल्याची माहिती समोर आली आहे.रस्ता खराब असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याची शक्यता आहे. खराब रस्ता असल्यामुळे नेहमीच अपघात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गौरव लक्ष्मण निरस (19 वर्ष. रा.पडेगाव ता. गंगाखेड) हा तरुण 12 वी वर्गाची शिकवणी करून आपल्या बहिणीला दुचाकीवरून पडेगावला घेऊन जात असताना गंगाखेड शहरांपासून 3 किमी अंतरावर एका पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या गौरव लक्ष्मण निरस याला गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.वैद्यकीय अधिकारी दिनेश बडे,परिचारिका रिता मरमट,उज्वला कराळे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवले.मात्र परभणी जिल्हा रुग्णालयात पोहचण्या पूर्वीच वाटेतच गौरव निरस या तरुणाचा मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon