अमरावतीतील बेलपुरा येथील 22 वर्षीय तरुण रितिक सोनकुसरे हा वारंवार आजारी पडत असल्याने रितिक चे वडील गणेश सोनकुसरे यांनी एका महिलेच्या सांगण्यावरून त्यांनी मुलगा रितिक याला उपचारासाठी आर्वी येथील तथाकथित मांत्रिक अब्दुल रहीम अब्दुल माजीद याच्याकडे 16 मे रोजी रात्री आणले होते. रितिकला बघितल्यावर तथाकथित मांत्रिकाने गणेश यांना सांगितले की तुमच्या घरात जीन आहे आणि तो मुमच्या मुलाच्या अंगात घुसला असून तो वरचढ झाला असल्याचे पटवून सांगितले.
त्यानंतर तथाकथित मांत्रिकाने गणेश सोनकुसरे यांच्या अमरावती येथील घरी येऊन पाहाणी केली.त्यानंतर रितिकच्या अंगातील जीन बाहेर काढून देतो असे सांगत 17 मे रोजी आर्वी येथील मांत्रिकाच्या घरी रात्री उशीरा पूजा मांडली.पूजे दरम्यान जीनला वश करून अधिकची अघोरी विद्या प्राप्त करण्याची ईच्छा बाळगणाऱ्या अब्दुल रहीम अब्दुल माजीद यानी त्याची दोन मुलं अब्दुल जुनेद अब्दुल रहीम व अब्दुल जमीर अब्दुल रहीम यांच्या मदतीने रितिक सोनकुसरे याची गळा दाबून हत्या केली.
आरोपी मांत्रिकाच्या घरीच भरायचा सैलानीचा दरबार
तथाकथित मांत्रिक अब्दुल रहीम अब्दुल माजीद हा मागील 18 वर्षांपासून घरीच अंधश्रधेचा दरबार भरवत असे.त्याने यालाच उदरनिर्वाहचे साधन बनविले होते.कुठलाही आजार बरा करण्यासाठी तो लिंबू, बिबवे, काळे धागे मंतरुण द्यायचा.आपण कुठलाही आजार बरा करतो असा देखावा करायचा.पुड्या बांधून देणे,अंडी मंतरुण रस्त्यावर फेकन्यास देणे,लिंबू कापून दोन फोडी करून लोकांना करणी केल्याचे सांगत असे.त्यातून तो अनेकांकडून पैसे उकळत असे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
याप्रकरणी आरोपी अब्दुल रहीम व त्याचे दोन मुलं असे तिघा बापलेकाविरुद्ध आर्वी पोलिसात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायाल्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघा आरोपिंना 27 मे पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon