डोंबिवलीमध्ये इमारतीत चोरी करताना आठव्या माळ्यावरून पडून एका चोराचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी


चोरी करताना पायघसरून पडल्याने एका चोरट्याचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी 

डोंबिवली : डोंबिवली जवळ असलेल्या खंबाळपाडा येथे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विद्युत साहित्य चोरी करण्यासाठी गेलेल्या दोन चोरट्यापैकी एकाच इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची तर एकजन गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना सोमवारी रात्री घडल्याची माहिती सहाय्यक आयुक्त जय मोरे यांनी दिली आहे.याघटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मोहम्मद भाटकर आहे तर या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव अरफात पिंजारी आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी चोरी आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

कल्याण डोंबिवली महापालिकेने खंबाळपाडा येथे गरिबांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत घरे बांधली आहेत.मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वादाच्या भौऱ्यात अडकल्याने हे प्रकरण न्यायप्रविष आहे. त्यामुळे या घरांचे पालिकेने लाभार्थ्यांना वाटप केलेले नाहीत. या घरातील खिडक्यांचे दरवाजे, विद्युत साहित्य आणि पाण्याचे नळ चोरटे नेहमी चोरून नेतात. यामुळे चोरटे आणि भंगार विक्रेते यांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे हे उपजीविकेचे साधन बनले आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे.मोहम्मद आणि आराफाह हे दोघे विद्युत साहित्य चोरी करण्यासाठी गेले होते.चोरी करत असताना आवाज आल्याने तेथील रखवालदाराला घरात चोर घुसल्याचे लक्षात आल्याने त्याने टॉर्च फिरवला. आपण पकडले जाऊ अशी चोरांना भीती वाटल्याने मोहम्मद आणि आरफाह हे पाईप द्वारे खाली उतरत असताना मोहम्मद चा पाय घसरल्याने आठव्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला तर त्याच्या पाठोपाठ त्याचा साथीदार आरफाह हा पडून गंभीर झाखमी झाला आहे.

या प्रकरणी रखवालदराने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून त्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याचे सहाय्यक आयुक्त जय मोरे यांनी सांगितले आहे.आराफाह याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून तो बारा झाल्यावर अटक करून त्याची पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Previous
Next Post »