अण्णा हजारेंना अचानक जाग आली आणि लोकायुक्त कायद्यासाठी रान पेटवणार असल्याची घोषणा केली


अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त लागू करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची केली घोषणा, मात्र राज्यातील जनता अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला किती महत्व देणार हे बघावे लागेल 
अहमदनगर : अण्णा हजारेंनी राज्यात लोकायुक्त कायदा कागू करावा यासाठी आंदोलन करणार असल्याची नुकतीच घोषणा प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कार्यकर्त्यांचे राळेगण सिद्धी येथे रविवारी शिबीर पार पडले. त्यानंतर राज्यात लोकायुक्त कायदा करावा यासाठी ते राज्य व्यापी जन आंदोलन करणार असून त्यासाठी ते रान पेटवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लेखी आश्वासन दिले होते आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकायुक्त कायदा करू असे लेखी आश्वासन देऊन अडीच वर्ष झाले आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत, त्यांना काय झालं माहित नाही यामागे काय दडलंय कळत नाही असे अण्णा हजारे यांनी प्रसार मध्यमांशी बोलताना सांगितले आहे.खरंतर अण्णा हजारे तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत मग आंदोलन करण्याचे तर दूरच.

अण्णा हजारे तुम्ही समाज सेवक नसून केवळ आरएसएस आणि भाजपासाठी सुपारी घेऊन आंदोलन करणारे आंदोलन जिवी आहात . तुम्हाला दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगार दिसत नाही, पेट्रोल डिझेल, घरगुती गॅस व खाद्य तेलाच्या आकाशाला बिडणाऱ्या किंमती दिसत नाहीत. महागाई मुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे कष्ट कऱ्यांचे हाल होताना दिसत नाही.दलित मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार झालेला दिसत नाही.अशावेळी तुम्ही कुंभकर्णी झोपेत असतात.

भाजपचा शंखणाद कानी पडला की तुम्ही कुंभकर्णी झोपेतून खडबडून जागे होतात आणि भाजपा विरोधी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा देतात.परंतु अशा सुपारीबाज आंदोलन जिवीला सर्वजन ओळखून आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही रान पेटवायचं म्हटलं तरी तुमच्या आंदोलनाला कोणी भीक घालणार नाही. केवळ आर एस एस आणि भाजपा वालेच तुमच्या आंदोलनात हवा भरण्याचे  काम करतील.बाकी महाराष्ट्रातील लोक सुज्ञ आहेत. तुमच्या अशा नाटकी आणि ढोंगी आंदोलनाला राज्यातील जनता भीक घालणार नाही एवढं मात्र नक्की.
Previous
Next Post »