कोकण कन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड ; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

कोकण कन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, 4 तासापासून वाहतूक ठप्प, प्रवाशी हैराण 
कोकण कन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ण पणे विस्कळीत झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री निघालेली कोकण कन्या एक्सप्रेस विलवडे रेल्वे स्थानाकात येऊन थांबली आहे.कोकण कन्या एक्सप्रेस च्या इंजिन मध्ये बिघाड झाला असल्याने पहाटे 5 वाजल्यापासून ही एक्सप्रेस थांबली आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

वृत्त लिहीपर्यंत रेल्वे मार्ग सुरु झाला नव्हता. म्हणजे 4 तासापासून रेल्वे वाहतूक खोलाबलेली आहे. इंजिन मध्ये नेमका काय बिघाड आहे हे अजून तरी समजले नाही. रेल्वे वाहतूक कधी पर्यंत पूर्ववत होईल हे देखील माहिती नाही.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी निघालेली कोकण कन्या एक्सप्रेस पहाटे साडेपाच नंतर रत्नागिरीवरून पुढे जाताना इंजिन मध्ये बिघाड झाल्याने विलवडे स्थानकावर गाडी थांबवण्यात आली आहे.रेल्वे वाहतूक कधी सुरळीत होईल याबाबत माहिती नसल्याने प्रवाशी मात्र हैराण झाले आहेत.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng