परभणी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा ; 4 पोकलेन 13 हायवा व 2 बोटी जप्त, 9 आरोपिंना अटक

अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धाडसी कार्यवाही, 13 हायवा, 4 पोकलेन, 2 बोटीसह 94 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, 35 जनाविरुद्ध गुन्हा दाखल,9 जन अटक 
परभणी : सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केली मोठी कार्यवाही. 10 मे रोजी केलेल्या कार्यवाहीत 4 पोकलेन,12 हायवा आणि 2 बोटीसह 94 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात 35 जनाविरुध गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 आरोपिंना अटक करण्यात आली आहे.

गंगाखेड व सोनपेठ येथील वाळू उपसा धक्का चालवणाऱ्यांना शासनाने नियम व आटी घालून दिल्या आहेत मात्र, नियमांचे उल्लंघन करत सर्रास पणे मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेनिक लोढा यांच्या पथकाने गंगाखेड व सोनपेठ तालुक्यातील मैराळ सावंगी व गौडगाव या वाळू उपसा धक्क्यावर ही कार्यवाही केली आहे. यामध्ये 2 भरलेल्या हायवा,11 रिकाम्या हायवा, गोदावरी नदीत 4 पोकलेन व 2 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या कार्यवाही मुळे वाळू माफियांचे मात्र धाबे दनानले आहेत. मात्र या कार्यवाही बाबत महसूल विभागाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मौन बाळगले आहे.
              (जप्त केलेले पोकलेन )

या कारवाई दरम्यान अनेक जन पळून गेले आहेत. एकूण 35 जनाविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 जनांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपिंमध्ये नजीर सुभान बागवान(रा.परळी.जि बीड ),समाधान बिडगर (रा दाऊदपूर ता. परळी ),संजय अंकुश राठोड (रा. बंजारवाडी तांडा, ता.परळी ),शंकर बबन फड (रा. कनेरवाडी ता. परळी ),अशोक अण्णा वावले (रा. परळी ),अर्जुन गणपती तिवाड (रा. करम ता. सोनपेठ ),बालाजी विठ्ठल जाधव (रा उस्मानाबाद ),शंकर साळुंके (रा. उस्मानाबाद ),बलभीम वैजनाथ दुमने (रा. महातपुरी ता. गंगाखेड ),भारत शिवाजी सूर्यवंशी (रा.कोरटेक ता. सोनपेठ),हरिभाऊ उजगिरे (रा.सायखेडा ता. सोनपेठ),रामेश्वर यादव (रा. सायखेडा ता.सोनपेठ),दिलीप दत्ता राठोड (रा धारावती तांडा ता. परळी ),संजय मुंडे अशी नावे आहेत.

Previous
Next Post »