या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगिनी पोवार यांचे सासरचे नाव योगिनी विकास कांबळे असून त्या 2011 साली पोलीस दलात भरती झाल्या होत्या. सध्या त्या पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या.पाच वर्षांपूर्वी मुंबई येथील विकास कांबळे (मुगाव भाटणवाडी ता. करवीर )यांच्यासोबत विवाह झाला होता.
विकास कांबळे हे सध्या खाजगी कंपनीत नौकरी करतात.
मागील काही दिवसापासून पती विकास कांबळे आणि त्यांच्यात सतत वाद होत होते. नुकत्याच त्या शनिवारी पुणे येथे पीएसआय पदासाठी परीक्षा देऊन आल्या होत्या. त्यांचे पती विकास कांबळे हे मित्राच्या लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. रात्री योगिनी यांनी वडिलांशी फोन वरून बोलणं केलं. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी पोलीस लाईन मधील रूममध्ये खिडकीच्या लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण व शाहूपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटना स्थळाला भेट दिली.या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
घटना स्थळी सापडली सुसाईड नोट
आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी मिळाली आहे.मुलं होत नसल्याने पती व सासूकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ होत आहे, या त्रासाला कंटाळून जिवन संपवत असल्याचे सुसाईड मध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
रविवारी घेतली होती रजा :
वडिलांसोबत लग्नाला बाहेर गावी जायचे असल्यामुळे योगिनी पोवारने रविवारची किरकोळ रजा घेतली होती. योगिनी यांचे वडील रविवारी सकाळ पासून फोन लावत होते. मात्र त्या फोन उचलत नसल्याने त्यांचे वडील मित्रासह थेट पोलीस लाईन येथील घरी पोहचले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे कळले. शेजारच्या पोलिसांच्या मदतीने खिडकी उघडून पहिली असता योगिनी या मृत अवस्थेत लटकलेल्या दिसल्या.
ConversionConversion EmoticonEmoticon