दिल्लीमध्ये झोपडपटीत भीषण आग ; 7 जनांचा मृत्यू तर 60 झोपड्या जळून भष्म

Delhi fire set:दिल्लीत झोपडपट्टीला भीषण आग, 7 जनांचा मृत्यू,60 झोपड्या जळून खाक 
दिल्ली : दिल्लीतील गोकलपुरी भागातील झोपडपटीत शुक्रवार आणि शनिवारच्या मध्य रात्री भीषण आग लागून 7 जनांचा मृत्यू झाला आहे तर 60 झोपड्या जळून भष्म झाल्या आहेत. घटनेची माहिति अग्निशमन विभागाला  मिळताच अग्निशमनच्या 13 गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्याची माहितीअग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गोकलपुरी पीएस भागात आगीची घटना पहाटे 1वाजता घडली असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (ईशान्य )देवेश कुमार महला यांनी सांगितले आहे.घटनेची माहिती पहाटे 1 च्या सुमारास मिळाली त्यानंतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटना स्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. आगीत मृत्यू मुखी पडलेल्या 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पहाटे 4 वाजता आगीवर नियंत्रण मिळवल्याचे ईशान्य दिल्लीचे डीसीपी यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटने विषयी दुःख व्यक्त केलं असून घटनास्थळी जाऊन भेट देऊन पीडित कुटुंबाची स्वतः भेट घेणार असल्याचे ट्विट करून सांगितले आहे. या दुर्घटनेत 7 जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 60 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

Previous
Next Post »