औरंगाबाद येथे होणारी राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा बीआरएसपी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांचा ईशारा
औरंगाबाद : राज्यात आणि देशात धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला (BRSP opposes Raj Thakaray's meeting in Aurangabad )बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा विरोध असून सभा होऊ दिली जाणार नसल्याचा ईशारा जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई मधील शिवाजी पार्क वर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याचं आवाहन केलं होत. त्यानंतर पुन्हा 12 एप्रिल रोजी ठाण्यातील उत्तर सभेत मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे.जर मस्जितीवरील भोंगे काढले नाही तर आम्ही 5 वेळा मस्जितीसमोर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात वाचन करू तसेच वेळ पडली तर शस्त्र ही हातात घेऊ असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील आणि देशातील मुस्लिम समाजात नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. देशातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपापल्या धर्मा प्रमाणे पूजा अर्चा करण्याचा व धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला असताना मात्र राज ठाकरे हे संविधान विरोधी भूमिका घेऊन हिंदू -मुस्लिम वाद निर्माण करून व धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवून आण्याचा प्रयत्न राज ठाकरे करीत आहेत.
राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वचा अजेंडा राबवत असून राज्यात व देशात हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याच्या उद्देशाने सभा घेत आहेत. सध्या मुस्लिमांचा रमजान चा पवित्र महिना चालू आहे. लवकरच रमजान ईद हा सन येणार असल्याने अशा प्रकारे वाद ग्रस्त वक्तव्य करून राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 1 मे रोजीच्या सभेला औरंगाबाद पोलीस व जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊ नये. सभेला परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू असा ईशारा अरविंद कांबळे जिल्हाध्यक्ष बीआरएसपी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon