जालना : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये जालना येथील मंडळात 133 पदांची नौकर भरती करण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र व ईच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत.सदर ची भरती प्रक्रिया फक्त जालना जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठीच आहे. याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि भरती प्रक्रियासंबंधीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पदाचे नाव : अप्रेंटीस (वीजतंत्री /तारतंत्री)
पदसंख्या : 133
नौकरीचे ठिकाण : जालना
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास व iTI पास (इलेक्ट्रिसिअन /वायरमन ).
वयोमर्यादा : 18 ते 21 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत : महावितरणच्या अधिकृत https://www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करून नंतर ऑफलाईन पद्धतीने महावितरणच्या जालना मंडळ कार्यालयात अर्ज जमा करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022 आहे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जालना मंडळ कार्यालय.
ConversionConversion EmoticonEmoticon