राजु शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर ; सरकारला मोठा झटका

राजु शेट्टी यांची महाविकास आघाडीशी काडीमोड
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष राजु शेट्टी यांनी महाविकास आघाडी मधून बाहेर पडल्याची केली घोषणा. मंगळवार 5 मार्च रोजी कोल्हापूर येथील कार्यक्रमात महाविकास आघाडीशी असलेले सर्व संबंध तोडले असल्याची जाहीर घोषणा राजु शेट्टी यांनी केली.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेत नसल्याने राजु शेट्टी नाराज होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागील अनेक दिवसापासून राजु शेट्टी नाराज असल्याने महाविकास आघाडी मधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. अखेर मंगळवारी कोल्हापूर येथील कार्यक्रमात महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा केली.महाविकास आघाडीचा कधीमोड घेताना त्यांनी म्हटले की आज जाहीर पणे सांगतो की यापुढे महाविकास आघाडीशी आमचा काहीही संबंध नाही.

राज्यातील भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत राज्यातील इतर 11  लहान सहान समविचारी पक्षाची आघाडी स्थापन झाली होती. केवळ भाजपा सत्तेत येऊ द्यायचे नाही याकरिता किमान सामान कार्यक्रमांतर्गत हे सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत इतर 11 पक्ष या आघाडीत सहभागी झाले होते. प्रामुख्याने त्यामध्ये राजु शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि डॉ सुरेश माने यांचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष यासह लहान सहान 11 पक्ष भाजपा विरोधातील आघाडीत सामील झाले होते.

2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावर भाजपाशी काडी मोड घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षासोबत हातमिळवणी केली. राजकारणात आणि प्रेमात सर्व काही चालते या म्हणी प्रमाणे शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक असताना सत्तेसाठी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षालाच सत्तेत सहभागी होण्याचा लाभ मिळाला.

2019च्या विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत ज्या इतर 11 पक्षांची कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुद्यावर आघाडी झाली होती. त्या 11 पक्षाला महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडता इतर पक्षांना वाऱ्यावर सोडले. सत्तेचे वाटेकरी हे तीनच पक्ष झाले. इतर पक्षांना कुठल्या मंडळावर संधी दिली नाही. कुठल्या शासकीय समितीवर सदस्य म्हणून घेतले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना निवडून येण्यासाठी आघाडीतील इतर पक्षांची मोठी मदत झाली आहे.

परंतु सत्ता मिळताच कामसरो आणि वैद्य मरो अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली. आघाडीतील कुठल्याच पक्षांना विचारात घेतले नाही. ज्या समान किमान कार्यक्रमावर आधारित मुद्यावर हे पक्ष एकत्र आले होते. त्यांना सरकारच्या कोणत्याही शासन निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याने हे 11पक्ष नाराज आहेत.त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी काल मंगळवारी कोल्हापूर येथे महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडल्याची घोषणा केली. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा  फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

                                                   संपादकीय...
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng