आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एसटी बसचा भीषण अपघात ; 7 प्रवाशांचा मृत्यू तर 45 जखमी

चित्तूर जिल्ह्यातील बकरापेठ येथील बस अपघातात 7 जनांचा मृत्यू, 45 जखमी 
चित्तूर :
आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीवरून शनिवारी रात्री हा अपघात झाला आहे. बस चालकाच्या निष्काळजी पणामुळे उंच कड्यावरून बस खाली कोसळल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात बस मधील 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 45 प्रवाशी जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर बकरापेठ येथे हा दुर्दैवी अपघात घडला असल्याची माहिती चित्तूर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
Previous
Next Post »