पुणे : राज्यातील टीईटी परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या घोटाळ्याशी संबंधित अटकेत असलेले आयएएस अधिकारी सुनील खोडवेकर यांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्का दायक माहिती समोर आली असून 240 कोटी रुपये आर्थिक गैर व्यवहार झाला असलेचे उघड झाले आहे.सुनील खोडवेकर यांचा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवार 5 मार्च रोजी जमीन अर्ज फेटाळला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते.
राज्यातील बहुचर्चित टी ई टी परीक्षा घोटाळ्यात अपात्र उमेदवारास पात्र करण्यासाठी 2 ते 3लाख रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.या प्रकरणात 20 पेक्षा अधिक आरोपीना अटक करण्यात आली असून अनेक अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.तब्बल 7 हजार 800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन पात्र करण्यात आल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
राज्यातली म्हाडा परीक्षा,आरोग्य विभाग परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा तपास चालू असताना टी ई टी परीक्षा घोटाळ्यातील अनेक पुरावे समोर येत आहेत. दिवसेंदिवस या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे.या घोटाळ्यात अनेक अधिकारी सहभागी असण्याची शक्यता असल्याचे पुणे सायब पोलिसांनी सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon