भाजपा नेते किरीट सोमय्या व नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी बजावलेल्या समन्सला दोघे ही गैर हजर


विक्रांत युद्धनौका संवर्धन निधी गैर व्यवहार प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बजावलेल्या समन्सला किरीट सोमय्या व नील सोमय्या दोघेही गैरहजर, अटक पूर्व जमानतीसाठी वकिलांनी केला अर्ज 
मुंबई : विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धन निधी गैरव्यवहार प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya & Nil Somaiya )व त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना ट्रॉम्बे पोलिसांनी शनिवारी बजावलेल्या समन्सला दोघेही गैरहजर राहिले. मात्र, त्यांच्या वकिलांनी अटक पूर्व जमानतीसाठी न्यायालयात अर्ज केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. अटक पूर्व जमानतीसाठी अर्ज केल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे.

किरीट सोमय्या व पुत्र नील सोमय्या यांच्या अटक पूर्व जमानती बाबत पोलिसांना न्यायालयात त्यांची बाजू मांडण्याचे देखील सांगितले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.या प्रकरणी सोमवारी सुनावणी होईल अशी शक्यता आहे.आयएनएस विक्रांत युद्धानौकेच्या संवर्धनासाठी 57 कोटींचा निधी जमा करण्यात आला होता. जमा झालेला 57 कोटी निधी राजभवनातील राज्यपाल कार्यालयात जमा करायला पाहिजे होता.मात्र तो निधी किरीट सोमय्या यांनी जमा केला नसल्याचा आणि निधीचा गैर व्यवहार केला असल्याची तक्रार बबन भोसले या माजी सैनिकाने दिलेल्या तक्रावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारीच्या अनुसंगाने फौजदारी दंड प्रक्रिय संहितेच्या कलम 43 (अ )अंतर्गत त्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी चौकशी साठी समन्स बजावला होता.परंतु शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत हे दोघेही चौकशी साठी हजर झाले नसून त्यांच्या वकिलांनी अटक पूर्व जमानतीसाठी अर्ज केल्याचे सांगितले आहे. किरीट सोमय्या व नील सोमय्या हे दोघेही पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे व्यस्त असल्यामुळे चौकशी ला हजर राहू शकले नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
Previous
Next Post »