राज्यात 38 आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती देऊन बदल्या करण्यात आल्या.
मुंबई : राज्य सरकारने बुधवारी ता.20 एप्रिल रोजी आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात करण्यात आल्या आहेत तर काहींना पदोन्नती देऊन विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख सह आयुक्त मिलिंद भारंबे यांना पदोन्नती देऊन विशेष जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी सह आयुक्त म्हणून सुहास कारके यांना नियुक्त केलं आहे. नाशिक चे पोलीस आयुक्त दिपक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली असून त्यांना राज्य महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती केली आहे.तर त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे यांची नाशिक चे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे.
उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पुण्याचे सह आयुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे.पिंपरी चिंचवडचे डॅशिंग आणि धडाकेबाज पोलीस आयुक्त म्हणून चर्चेत असलेले कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारतील.
सुरेश कुमार मेकला (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग),रवींद्र शिसवे (राज्य मानवी हक्क आयोग),यांचा समावेश आहे.तर उपमहानिरीक्षक पदावरून बढती देऊन बदली विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुकी दिल्या अधिकाऱ्यामध्ये लखमी गौतम( आस्थापना महाराष्ट्र पोलीस ),सत्यनारायण (सागरी सुरक्षा ),एस जय कुमार (प्रशासन, महाराष्ट्र पोलीस),निशित मिश्रा (दहशत वाद विरोधी पथक ),सुनील फुलारी (मोटर परिवहन विभाग ),संजय मोहिते (कोकण परीक्षेत्र ),सुनील कोल्हे( सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग),दत्तात्रय कऱ्हाळे (सह आयुक्त ठाणे शहर),प्रवीण पवार (संचालक,महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी ),बी जी शेखर (नाशिक परीक्षेत्र ),संजय बाविस्कर (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग ),वीरेंद्र मिश्रा (उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई ) आदींचा समावेश आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon